दुरितांचे तिमिर जावो |
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
आयुष्याची संध्याकाळ आपल्या आजी आजोबांची सुखाने जावी यासाठी किताबवारी परिवाराकडून आज द्वारकामाई वृध्दाश्रम मध्ये साखळीतले पाचवे ग्रंथालय दीपावलीच्या शुभमुहू्तावर सूरू केले. या ठिकाणी ४०-५० वृध्द राहतात. त्यांच्या दैनंदिन जीवन करमणुकीने जावे यासाठी नवनवीन पुस्तकं दीले. त्यानंतर किताबवारीच्या परिवारातल्या सदस्यांनी कविता, गोष्टी, याचं अभिवचन केले. त्यांनतर छोटासा खेळ सुध्दा घेतला. शेवट पसायदानने झाला. अशा प्रकारे किताबवारीने आगळी वेगळी दिवाळी साजरी केली.
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानपसावो
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला