जि. प. शाळा जळकी (व) येथे किताबवारी वाचनालयाचे उदघाटन.
'वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे वाचनाशिवाय शैक्षणिक विकास होऊ शकत नाही. त्यात दुर्गम भागात अपुऱ्या सुविधा मुळे, इंटरनेट , पुस्तकाचा अभाव यामुळे शैक्षणिक विकासात पाठीमागे राहतात . ही गरज ओळखून अजिंठा डोंगररांगेतील दुर्गम अशा जि. प. शाळा जळकी (व) ता. सिल्लोड येथे 'किताबवारी' च्या सहकार्यातून वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.
जळकी शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश सोनवणे सर यांनी किताबवारीला संपर्क करून दुर्गम भागातील शाळेला पुस्तके देण्याची विनंती केली. संस्थेने लगेच होकार देऊन शाळेसाठी २०० पुस्तके भेट दिली.
दि २०/०९/२०२२ रोजी मा. फकिराजी इंगळे साहेब, माजी अध्यक्ष जि. प. औरंगाबाद, यांच्या हस्ते व उंडणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा. साहेबरावजी आराक सर यांच्या अध्यक्षतेखाली वाचनालयाचे उदघाटन पार पडले. प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैशाली रामेश्वर जेढर, जळकी सरपंच मनीषा समाधान जेढर , माजी अध्यक्ष सुभाषजी जेढर, माजी सरपंच समाधान बदर ,उपसरपंच शालीकदादा पारधे, मा विष्णू बदर, गजानन हाके ,साळवे प्रभाकर दांडगे ,मुख्याध्यापक तिडके सर, शिक्षक राठोड सर, अंभोरे सर ,उमेश सोनवणे सर उपस्थित होते . मुख्याध्यापक तिडके सर यांनी प्रास्ताविक करून किताबवारीचे आभार मानले. मा इंगळे साहेब यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. दुर्गम भागात कार्य केल्याबद्दल किताबवारीला धन्यवाद दिले व उपक्रमाचे कौतुक केले. श्री आराक सर यांनी वाचनात अवांतर वाचनाची गरज स्पष्ट केली. किताबवारीला शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले. श्री उमेश सोनवणे सर यांनी किताबवारीचे आभार मानून किताबवारी कायम आपल्या दुर्गम भागातील शाळेसाठी शैक्षणिक मदतीसाठी काम करत राहील असे किताबवारी परिवाराच्या वतीने सांगितले.
मा गटशिक्षण अधिकारी श्री पवार सर व विस्तार अधिकारी फुसे सर यांनी कार्याला शुभेच्छा दिल्या.