नाचु कीर्तनाच्या रंगी|
ज्ञानदीप लावू जगी||
हेच ज्ञानाचे दीप तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी "किताबवारी" कार्यरत आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये किताबवारी व रा. से. यो. यांच्या सहआयुक्ताने "Book Donation Drive" पार पडली. किताबवारीचे उद्दिष्ट व ध्येय हे फर्ग्युसन महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. Drive मध्ये अनेक प्रतिक्रिया बघायला मिळाल्या, काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावातली सद्यस्थिती आणि त्यावर त्यांनी आवाज कसा उठावला हे मांडले.
Drive मध्ये निरनिराळ्या प्रकारची शंभरहून जास्त पुस्तके आली. त्यात सत्याचा प्रयोगापासून ते अग्निपंखापर्यंत, महान व्यक्तींची चरित्र यांचीही भर पडली. इंग्रजी मधील महान लेखक Charles Dickens, Khalid Hussain,Paulo Coelho यांचे पुस्तकही संग्रही आले आहे. प्रत्येक पुस्तकामागे एक लपलेली गोष्ट होती जी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमकत होती. किताबवारीच्या ह्या पुढाकाराने अनेक विद्यार्थ्यांच्या मनात वाचन व त्याचे महत्त्व याचा वेगळा ठसा उमटला गेला.
असच ज्ञानदान करत रहावे, शेवटी विंदा करंदीकर यांच्या काही पंक्ती-
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे,
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.