घरात कोणतीही साहित्याशी निगडित पार्श्वभूमी नसताना,केवळ सभोवतालच्या वातावरणाने एक व्यक्ती साहित्याशी जोडला जातो, एका निमशहरी भागातून आपली आवड जोपासण्यासाठी स्थलांतर करतो आणि साहित्य हेच आपलं करियर म्हणून पाहतो, आणि आपल्या कथा कादंबऱ्या च्या माध्यमातून वाचकांना न्याय देतो, अगदी कमी वयात साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होतो, एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आपलं आयुष्य जगणाऱ्या प्रणव सखदेव सरांशी युथ बुक स्टोर च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला, प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन, राहण्यातील साधेपणा आणि साहित्यासाठी त्यांनी अर्पण केलेला आपल सर्वस्व. नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, पुरस्कारानंतरच्या भावना, वैयक्तिक आयुष्य, आणि भविष्यातील प्लॅन या सर्व गोष्टी पॉडकास्ट च्या माध्यमातून युथ बुक स्टोरच्या युट्युब चॅनेल वर पाहायला मिळतील.