पुस्तके "चित्रपटा"समान असतात अन त्यांचे लेखक त्या चित्रपटाचे नायक.
किताबवारी फाऊंडेशन स्थापन झाल्यानंतर अनेक टप्प्यांवर विचारांना, आमच्या कामांना कलाटणी देणारे क्षण आले,अन त्याचाच पुढचा टप्पा असलेल्या youth bookstore च्या माध्यमातून सुरु झालेला साहित्यप्रेमींचा लेखक कट्टा.
Youtube, Social मीडिया च्या माध्यमातून आजवर कित्येक लोकांच्या मुलाखती आम्ही पाहत आलो,कधी काळी आपणही अश्या मुलाखती चर्चसात्रे घेऊन मैफिली रंगवायला हव्या म्हणून पाहिलेली स्वप्न जेव्हा सत्यात उतरतात न तेव्हा मिळणारा आनंद न मोजला जाणारा.
अश्याच आमच्या पुस्तक दुनियेतील नायक डिअर तुकोबा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक विनायकजी होगाडे यांच्याशी पहिला (शुभांकर) भाग लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्यांनी मोकळेपणाने दिलेली उत्तरे, त्यांचा व्यासंग, अभ्यासाचा आवाका आणि पत्रकार असूनही वारकरी संप्रदाय प्रथमपुरुषी मानणाऱ्या या अवलियास ऐकायला विसरू नका.