"किताबवारीच्या" माध्यमातून पुणे विद्यापीठात पुस्तक संकलन मोहीम.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त किताबवारीच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाचून झालेली पुस्तके संकलित करण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती.या माध्यमातून जमा झालेली पुस्तके ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रंथालय उभारून त्या ठिकाणी देण्यात येतील,यातून लहान मुलांना अंगी अवांतर वाचनाची आवड जोपासण्याचा प्रयत्न केला जाईल.याप्रसंगी विद्यापीठातील विविध विभागांतून विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी पुस्तके दान करून एक नवा आदर्श निर्माण केला. याप्रसंगी किताबवारी मोहिमेचे कार्यकर्ते ओंकार शेलार, अजिंक्य शिंदे, सत्यजित गाडे, गणेश साळुंखे,अतुल बाहे,महेश रहाणे, कृष्णकांत येरनूळे,उपस्थित होते