किताबवारी म्हणजे दूरवर वसलेल्या खेड्यातील एका वृद्धाची वाचनाची आवड, किताबवारी म्हणजे ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या भविष्याची वाट,किताबवारी म्हणजे आपलं वाचून झालेलं ज्ञान इतरांपर्यंत पोहचवणारी चळवळ, किताबवारी म्हणजे पुस्तकांची वाचकांच्या परिघातून देवाणघेवाण, किताबवारी म्हणजे उद्याचा विचार,किताबवारी म्हणजे युवकांच एकीकरण, किताबवारी म्हणजे युवकांनी युवकांशी बांधिलखी राखत चालवलेली मोहीम.....
खरंतर एखादी संकल्पना मनात आली ती कागदावर लिहली कि लगेच सिद्धीस जात नाही, त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागत.
किताबवारीची संकल्पना अगदी कौतुकास्पदच, अगदी नाव ठरविण्यापासून ते लोगो आणि काय कार्य करायचं हे एकत्रित ठरल्यानंतर 1 मे लाच महाराष्ट्र दिनाच अवचित्त साधत किताबवारी या संकल्पनेच प्राथमिक स्तरावर उद्घाटन झाल.अगदी थोड्याच दिवसात पुस्तके गोळा करण्यापासून ते वाचनालयची सुरवात कोणत्या गावी करायची याची सगळी कामे नेटाने पूर्ण होत शिवराज्याभिषेक दिनी पहिल्या वाचनालयाच उदघाटन कोपरगाव या ठिकाणी डाऊच बु. या गावी झालं. आणि अलीकडेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी राहता तालुक्यात नपावाडी या ठिकाणी दुसऱ्या वाचनालयची दारे खुली करण्यात आली. किताबवारीचा हा सोहळा असाच अविरत सुरु राहो, शुभेच्छा आणि अभिनंदन
ओमकार शेलार