किताबवारीची सुरुवात

0
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
भगवान श्री कृष्णाने सांगीतले आहे की ह्या जगात ज्ञानासारखे पवित्र असे दुसरे काही नाही. तर हाच श्लोक घेऊन आम्ही आपल्या पुढल्या पिढीला ज्ञानाचा साठा देण्यास आलो आहे.

 तर kitabwaari काय आहे, जसे आषाढी कर्तिकेला आपले वारकरी पंढरपूर ला जातात, पंढरपूर ला जाताना वारकरी गावागावातून जातात, जाताना ते शांती, समृध्दी, बंधुभाव याचा संदेश देतात तसेच आम्ही आमची kitabwaari गावागावातून घेउन जाऊन वाचनाचा संदेश देणार आहोत, आणि पुढची येणारी पिढी मोबाईल कडे जास्त न जाता पुस्तकांकडे वळली पाहिजे त्यासाठी हा प्रयत्न. 

तूम्ही म्हणशाल ह्या kitabwaari चा संकल्पना कशी, कुठे उदयास आली. १४ एप्रिल ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी त्यांचे चरित्र वाचताना एक गोष्ट लक्षात आली की हा माणूस किती समृध्द झाला असेल त्यात एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे पुस्तक, कारण त्यांच्या आयुष्यात त्यानी ३०००+ पुस्तके वाचली होती आणि ते बोलले होते की मला जगातील सगळी पुस्तके वाचण्यास १२ वेळा जन्म घ्यावा लागेल. त्यांचं अजुन एक वाक्य आहे,
"जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल". तर पुस्तकांचं त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व होत ते ह्या वाक्यात समजते. मग काय वडिलांना सांगीतले ही संकल्पना की आपल्या गावात ग्रंथालय नाहीय तर आपण सूरू करु त्यांनी होकार दिला नंतर मित्रांना सांगीतले आणि ह्या संकल्पनेवर काम करायला सुरुवात झाली.
Kitabwaari नाव देण्यामागचे कारण म्हणजे ही आमची संकल्पना एकाच गावात न राहता इतर गावात सुध्दा न्यायची आहे.

महाराष्ट्राच्या दुर्गम भागात ज्या भागात अजुन ज्ञानासारखे अमृत पोहचले नाही त्या भागात आम्हाला ग्रंथालय उभी करायची आहे. खेड्यापाड्यात अजुन ही ज्ञानाची गंगा पोहचली नाहीय, तरूण मुले अजूनही भरकटलेले आहे, तर त्यांना ह्या पुस्तकातून दिशा भेटेल हा एक प्रामाणिक प्रयत्न. कारण आजवर जेवढे जेवढे महापुरुष झाले आहे त्यांच्या परक्रमामागे कोठेन कोठे पुस्तकांनी मदत केली आहे .

आम्ही आमची पहिली किताबवारीची वारी डाऊच बुद्रूक ह्या गावात न्हेली. अहमदनगर जिल्ह्यातील, कोपरगांव तालुक्यात हे छोटेसे गाव. ह्या गावात पहिली ते आठवी शाळा आहे. तर त्या मुलांच्या हिशोबाने पुस्तकं खरेदी केली. ह्या पुस्तके घेण्यासाठी किताबवारीच्या परिवारातील सदस्यांनी पैसे जमा केले. ६ जून ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या दिवशी कोपरगांव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे साहेब तसेच कोपरगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, आणि जन उत्कर्ष प्रबोधिनी पालघर ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास जाधव हे उपस्थीत होते.
तुमच्या सारख्या युवकांनी सुरु केलेली ही ज्ञानाची वारी सर्व गावागावांत पसरून ज्ञानाचा दिवा असाच पेटत राहो व समाजसेवेच  कार्य घडण्यास तुम्हाला आणखी बळ मिळो असे उदगार देखील तहसीलदार साहेब यांनी  मनोगत व्यक्त करताना काढले. तसेच महात्मा गांधी, ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रच संदर्भ देऊन वाचन संस्कृती का गरजेची आहे हे पटवून देताना पोलीस निरीक्षक साहेबांनी कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या दिवशी गावातील ग्रामस्थांनी भरघोस अशी पैश्याच्या स्वरूपात मदत केली. ह्याच मदतीचा आधार घेउन आम्ही आमची वारी पुढल्या गावात घेऊन जाणार आहोत. 

आपण सगळे ह्या किताबवारीत सामील होऊन ह्या वारीचे वारकरी व्हा आणि गोरगरीब पाड्यावरच्या मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावण्यास हातभार लावा..

आकाश दहे.
Founder - Kitabwaari 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !